कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सर्वसाधारण कार्यक्रम पत्रिका.२०२३ अन्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३/१०/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वाजता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परभणी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप मा.श्री.एस.जी.लांडगे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलीनी उच्च शिक्षण घेवुन समाजातील चांगले कामे करुन आपली व देशाची वेगळी नावलोकिक करावे. सदरील कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक अॅड.युसुफजई नाहीन मॅडम, पॅनल विधीज्ञ, परभणी यांनी बालिकांना प्रेरित करुन चांगले व्यासपीठ निर्माण करण्यास मदत केली. तसेच प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती चंद्रमोरे आर.व्ही, मुख्याध्यापीका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परभणी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तर सुत्रसंचलन कु.अक्षरा कचरे हीने केले.
आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परभणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी येथील कर्मचारी वृंद, शिक्षीका यांनी प्रयत्न केले. तसेच सदरील कार्यक्रमास एकुण ७४ जणांची उपिस्थती होती.