बंद

    Home-4-mr

    • परभणी

      जिल्हा न्यायालय परभणी

    • जिल्हा न्यायालय परभणी

      जिल्हा न्यायालय परभणी

    जिल्हा न्यायालयाबद्दल

    परभणी जिल्हा न्यायालयाची स्थापना १९५१ साली निजाम राजवटीत झाली. जुन्या न्यायालयाच्या इमारतीला दारूल-इन्साफ असे नाव देण्यात आले. पहिले विद्यमान जिल्हा न्यायाधीश श्री. ताराचंद गुप्ता. जिल्हा न्यायालयाच्या नवीन न्यायालयाच्या इमारतीची स्थापना सन 1994 मध्ये करण्यात आली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती, न्यायमूर्ती एम.बी.शाह यांच्या हस्ते दिनांक 24 ऑगस्ट, 1996 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. शहर आणि रेल्वे स्टेशन आणि सेंट्रल बस स्टँडच्या अगदी जवळ आहे. जिल्हा न्यायालय, परभणी हे जिल्हाधिकारी, तहसील आणि महानगरपालिका कार्यालयाच्या लगत आहे. न्यायीक जिल्हा हिंगोली वेगळ न झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी मार्फतच महसुली जिल्हा हिंगोली चे ही कामकाज चालविल्या जाते परभणी जिल्ह्यांतर्गत परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पालम, सेलू, जिंतूर, आणि पूर्णा तालुके येतात आणि या सर्व तालुक्यांना न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत- शिवाय हिंगोली जिल्ह्याच्या अखत्यारीत येणारे तालुके हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, बसमत आणि औंढा नागनाथ या ठिकाणीही न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण (14) तालुके समाविष्ट आहेत.

    अधिक वाचा
    Shri. D.K. Upadhyaya
    सन्माननिय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई श्री . देवेंद्र कुमार उपाध्याय
    Shri. N.B. Suryawanshi
    सन्माननिय पालक न्यायमूर्ती श्री. नितीन भगवंतराव सुर्यवंशी
    Shri. Y.G. Khobragade
    सन्माननिय पालक न्यायमूर्ती श्री. वाय.जी. खोब्रागडे
    श्रीमती यु.एम. नंदेश्वर
    सन्माननिय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी श्रीमती उज्वला म. नंदेश्वर

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा